महिना लोटला तरी जिवघेणा खड्डा तसाच
बीड (रिपोर्टर):- गेल्या अनेक वर्षानंतर बीड शहरातील मित्र नगरचा मुख्य रस्ता करण्यात आला. मात्र हा रस्ता करतांना जाविपूर्वक काही ठिकाणी अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आले. मुख्य रस्त्याचे काम होवून महिना लोटला तरी ते व्यवस्थीत करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहण करावा लागतो. मित्र नगरच्या मुख्य रस्त्यावर एका नालीच्या बाजुला भला मोठा जिवघेणा खड्डा खोदून ठेवला आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर तो बुजवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड शहरातील मित्र नगर भागात कसल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. येथील मुख्य रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले होते. नागरिकांनी अनेक वेळा येथील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी गेल्यानंतर त्या रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर तीन महिने हे काम पूर्ण होण्यासाठी लागले. तोपर्यंत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मुख्य रस्ता करतांना अंतर्गत रस्ते खाली गेले अन् मुख्य रस्ता वर झाला. मात्र गुत्तेदार अन् लोकप्रतिनिधींनी जानिवर्पूक अंतर्गत रस्ते तसेच ठेवले. याला एक महिना लोटला तरी देखील त्याचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहण करवा लागत आहे.
स्थानिक प्रतिनिधीला प्रश्न विचारल्याने
’तो’ खड्डा बुजवला नाही
मित्र नगर मध्ये सकल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. नाल्या तुंबलेल्या असतात. घंटा गाडी येत नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मोकाट कुत्र्यांचा त्रास यासह अनेक समस्या येथील नागरिकांना सहन कराव्या लागाता. त्यातच मित्र नगर भागातील मुख्य रस्त्याच्या मधोमध भला मोठा जिवघेणा खड्डा पडलेला आहे. तो खड्डा बुजवावा असे एका मतदार महिलेले रस्ता उद्घाटनासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना खडेबोल सुनावले होते. त्यामुळे रस्ता करतांना तो खड्डा जास्त गोदण्यात आला मात्र बुजवला नाही. लोकप्रतिनिधीविरुध्द मित्र नगरच्या नागरिकांमधून तिव्र संपात व्यक्त केला जात आहे.