कडा (रिपोर्टर): वनपरिक्षेत्र हद्दी लगत एका खाजगी शेतकर्याची विहीर आहे. विहीराला कठडे नसल्याने शिकारीच्या मागे पळत असताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री समोर आली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी जाळीच्या माध्यमातून बाहेर काढले.
आष्टी तालुक्यातील देवळाली (पानाची) येथील वनपरिक्षेत्र हद्दी लगत बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान वनपरिक्षेत्र कर्मचारी फिरत असताना परिसरात पाच परस खोल असलेल्या विहीरत पडला होता.दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता बिबट्या विहीरीत पडुन मृत झाल्याचे निदर्शनास आले. रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या कर्मचार्यांनी जाळ्याच्या माध्यमातून बाहेर काढले. पशुवैद्यकीय पथक प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक साठे, डॉ.धनजंय राजगुडे, डॉ.आश्विनी चोपडे, डॉ.भाऊसाहेब कावदार यांनी शवविच्छेदन करत वनपरिक्षेत्र हद्दीत मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.
यावेळी आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, वनपाल बाबासाहेब मोहळकर , वनरक्षक अशोक काळे, बाबासाहेब शिदे, बन्सी तांदळे,शेख युनूस, दत्तु भुकन,कानिफनाथ पवार,जयसिंग मोहिते, उपस्थित होते. सदरील बिबट्या अंदाजे दोन वर्षाचा असुन पाण्यात पडल्याने तीन दिवसापुर्वी मृत्यू झाला असावा असे पथक प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक साठे यांनी लोकमतला सांगितले.