आटल्याचे साथीदार पकडले
बीड (रिपोर्टर): नगर जिल्ह्यातील बेलगाव् येथील अटल्या उर्फ अटल ईश्वर भोसले याला काही दिवसापूर्वी आष्टी पोलिसांनी शिराळ शिवारातून अटक केली. या टोळीवर नगर ,बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
या टोळीने नगर जिल्ह्यातील खरवंडी कासार, ता. पाथर्डी येथे दरोडा टाकून संजय रावसाहेब घुले यांच्या घराचा दरवाजा कशाने तरी तोडुन, आत प्रवेश करुन, कुटूंबियांना मारहाण व जखमी करुन 80,100/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख चोरुन नेले होते. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 726/2023 भादविक 395 प्रमाणे दरोडा चोरी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीची शोध घेत असताना ीरिप;संशयीत आरोपी शामुल काळे रा. आष्टी, जिल्हा बीड हा विना नंबर मोटार सायकलवर त्याचे साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी वाकी रोडने, मिरजगांव येथे येणार आहे,अशी माहिती मिळताच मिरजगांव येथील वाकी जाणारे रोडवर सापळा लावुन थांबलेले असताना वर्णना प्रमाणे दोन इसम विनानंबर मोटार सायकलवर येताना पथकास दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्यांनी मोटार सायकल थांबविली. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शामुल नवनाथ काळे वय 23, व 2) अमोल नवनाथ काळे वय 22, दोन्ही रा. वाकी, ता. आष्टी, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले. संशयीत आरोपींची पंचा समक्ष अंगझती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने मिळुन आले त्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे संदीप ईश्वर भोसले, आटल्या ईश्वर भोसले, दोन्ही रा. बेलगांव, ता. कर्जत, होम्या उध्दव काळे रा. वाकी, ता. आष्टी, जिल्हा बीड व कृष्णा विलास भोसले रा. हातवळण, ता. आष्टी, जिल्हा बीड (सर्व फरार) अशांनी मिळुन पाथर्डी येथील घरात घुसून मारहाण करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना 2,39,000/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, एक ड्रिम निओ मोटार सायकल, 1 वन प्लस व 1 विवो कंपनीचा मोबाईल फोन अशा मुद्देमालासह ताब्यात घेवुन पाथडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.