‘लोक माझ्या सांगाती’ मधला पॅराग्राफ वाचा -धनंजय मुंडे
17 तारखेच्या पुर्वसंध्येला माझा इतिहास विचारण्यात आला. देवाने आज्ञा केलीय, भक्ताने त्या आज्ञेचं पालन करायलाच पाहिजे, बीड जिल्ह्याच्या मायबापांना माझा इतिहास माहित आहे की नाही, असा उपस्थितांना सवाल करत कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी 2010 ला भाजपातून जेव्हा मला काढण्यात आलं, तेव्हा विधान परिषद निवडणुकीत दोन मते दादांनी मला दिले आणि आज धनंजय मुंडे राजकारणामध्ये तुमच्यासमोर उभा ठाकू शकला. माझा इतिहास जिल्ह्याला माहित आहे, जो संघर्ष केला, तो संघर्ष स्व. मुंडेंकडून शिकलो. मोठे साहेब आणि दादांकडून शिकलो, हे मी सांगण्यापेक्षा साहेबांच्या लोक माझ्या सांगातीमध्ये एक पॅराग्राफ माझ्या दैवताने माझ्यावर लिहिला. सवाल इस बात का नाही है, शिशा बचा है के फुटा है, सवाल इस बात का है, पत्थर किस तरफसे आया है’ असे म्हणत धनंजय मुंडेंनी पलटवार करून 2019 च्या निवडणुकीत निकाल लागण्याअगोदर बाहेरून पाठिंब्याची घोषणा कोणी केली, असा उपस्थितांना सवाल करून दादा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि दुष्काळ हटवण्यासाठी जिल्हावासियांना वादा करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. बीड जिल्ह्याने साहेबांवर प्रचंड प्रेम केले. परंतु साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिले? असा सवालही त्यांनी या वेळी केले.
अभुतपूर्व आणि न भूतो न भविष्यती अशा जाहीर सभेत बोलण्यासाठी उभे राहिल्याबरोबर कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हा वासियांसमोर नतमतस्तक होत आजची सभा ही 17 तारखेच्या सभेला उत्तराची नव्हे तर बीड जिचल्ह्यातील जनतेच्या उत्तरदायित्वाची सभा असल्याचे सांगितले. 17 तारखेला सांगण्यात आले, जिल्ह्याने साहेबांवर प्रचंड प्रेम केले मात्र जिल्हावासियांच्या त्या प्रेमापोटी साहेबांनी जिल्ह्याला काय दिले? आजपर्यंत जे काही दिले ते अजितदादांनी बीड जिल्ह्याला दिले. तेच साहेबांचे उत्तरदायित्व म्हणावे लागेल. ही सभा विकासाची, अस्मितेची, स्वाभिमानाची आणि दुष्काळ कायम मिटवण्याची सभा आहे. दादांबाबत सिनेमातील डायलॉग बालेायचाच झाला, ‘मै जो बोलता हुँ करके दिखाता हुँ’ असे अजितदादा आहेत. अजितदादा तुम्ही आमच्या जिल्ह्याच्या विकासाचा वादा करा, या आधी गोदावरीवर बॅरेगेजेस केले, जिथे कुसळ उगवत नव्हती तिथे ऊस आणि कापूस बहरू लागला. स्व. मुंडे साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या महामंडळाकडे दुर्लक्ष होत होते.
तुम्ही अर्थमंत्री झालात अन् महामंडळाला एक टन ऊस गाळला तर 10 रु. असा निर्णय झाला, इथे थोडी संथगती झाली आहे, ती गती आणायला हवी, तुम्ही मनात आणलं तर बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायम मिटेल, दादा भलेही राज्याच्या तिजोरीचे बीड जिल्ह्यासाठी थोही सांध मोठी ठेवा, अशी अपेक्षा आहे. आम्ही आपल्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याच्या जनतेची सेवा करणार आहोत. एकच खंत वाटते, बीड जिल्ह्याच्या जनतेला धनंजय मुंडेचा इतिहास माहित आहे की, नाही, 17 तारखेच्या पुर्वसंध्येला माझा इतिहास विचारण्यात आला, जिल्ह्यातील जनतेला माझा पुर्ण इतिहास माहित आहे मात्र देवाने आज्ञा केली तर ते भक्ताने ऐकायलाच हवे. 2010 ला भाजपातून मला काढण्यात आलं, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन मते कमी पडत होते, ते न मागता दादांनी मला दिले आणि राजकारणात तुमच्यासमोर आणलं. असं म्हणत धनंजय मुंडेंनी राजकारणातला संघर्ष समोर मांडत शरद पवार यांच्या लोक माझ्या सांगाती मध्ये माझ्याबाबत, माझ्या संघर्षाबाबत एक पॅराग्राफ दैवतानेच लिहिल्याचे म्हटले. आज साहेबांच्या व्यासपीठावरून कोणीही उठावं, काहीही बोलावं, दादांना लबाड बोलावं, हे साहेबांचे संस्कार नाहीत, जात-धर्म काढावं हे साहेबांचे संस्कार नाहीत असे म्हटले.