माजलगाव येथे शेतकरी पक्षाचा तब्बल दीड तास रस्ता रोको
माजलगाव (रिपोर्टर) दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या, संपूर्ण कर्ज माफ करा, मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, या व इतर मागण्या साठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने परभणी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .
शेतकर्याच्या गुरांना दावणीला चारापाणी द्या,गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ खात्यात वर्ग करा,मराठवाड्याला पाण्याचे समन्यायी वाटप करा, बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी गतवर्षीचे तीन हजार रुपये प्रमाणे बिल अदा करावे,विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करा, या मागणीसाठी माजलगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचा तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी घोषणा बाजीने परिसर दणाणून सोडला,यावेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
या वेळी भाई मुंजा पांचाळ भाई परमेश्वर डाके भाई विष्णू शेळकेभाई दत्तामामा कांगडे गेवराई ऊसतोड कामगार संघटनेचे राज्यअध्यक्ष जीवन राठोड,मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नीलाराम टोळे अंगद खांबे व साळुजी हांडे,राजेभाऊ शेरकर लक्ष्मण आप्पा चव्हाण लक्ष्मण बादाडे संतोष बादाडे पाथरूड चे सरपंच कजीम मनसबदार पिंटू शिंदे, भाई माऊली जाधव ,माऊली चव्हाण, माऊली गडदे, सदानंद भांड, कैलास काळे, पापा घाडगे, अनिल नाईकनवरे, संकेत लंगडे,गणेश डाके, माऊली डाके, सुभाष थोरात, शेख जुबेर,आदित्य हांडे, मनोहर माने, बाळासाहेब घुमरे, गणेश धरपडे यांच्यासह महिला भगिनी व हजारो शेतकरी बांधव आंदोलनात उस्फूर्तपणे सहभागी झाले होते..