एटीएम मशीन उखडली, पोलीस येताच घटनास्थळी मशीन टाकली; पो.कॉ. क्षीरसागर, बांगरांच्या तत्परतेने मोठी चोरीची घटना टळली, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
बीड (रिपोर्टर)- डोक्याला टोपी, तोंडाला रुमाल, हातात ग्लोज घालूनआलेल्या तीन चोरट्यांनी येळंबघाट येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन उखडून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र टेक्नॉलॉजीमुळे याची माहिती एटीएम हेड ऑफीसला माहित झाली. त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली तेव्हा अवघ्या काही मिनिटात नेकनूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विशाल क्षीरसागर व सुखदेव बांगर हे घटनास्थळावर पोहचले. पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवणार्या चोरट्याच्या साथीदारांनी चोरट्यांना याबाबत माहिती दिली असावी त्यामुळे चोरटे एटीएम त्याच ठिकाणी टाकून पळून गेले. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सदरची घटना मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नेकनूर पोलिसांचे कौतुक होत आहे. याबाबत अधिक असे की, नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या येळंबघाट येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन उखडून घेऊन जाण्याच्या तयारीत काही चोरटे मध्यरात्री दरम्यान येळंबघाटमध्ये आले होते. ईयरटीका गाडीमधून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी अगोदर ईयरटीका गाडी एटीएम असलेल्या ठिकाणी लावली. त्यामधून दोन चोरटे बाहेर उतरले. त्यांच्या डोक्याला टोपी होती, तोंडाला रुमाल बांधण्यात आलेले होते. हातात ग्लोज होते. या चारेट्यांनी सर्वप्रथम एटीएमच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारला. गाडीची डिक्की उघडली. त्यातील दोरखंड बाहेर काढून तो एटीएम मशीनला बांधला. हे सर्व कृत्य एटीएम मशीनमध्ये असलेल्या गुप्त कॅमेर्यामध्ये टिपले गेले. बांधलेल्या दोरातून एटीएम मशीन एका झटक्यात चोरट्यांनी बाहेर काढले. त्याच वेळी सुरक्षेच्या दृष्टीने वापरलेल्या यांत्रीक उपकरणामुळे एटीएमची छेडछाड होत असल्याचे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेला समजले. त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी दुसर्याचक्षणी अत्यंत वेगात पोलीस कर्मचारी विशाल क्षीरसागर व सुखदेव ाबंगर या दोघांनी घटनास्थळ गाठले. पोलीस आल्याचे पाहून चोरटे एटीएम मशीन तिथेच सोडून पळून गेले. सदरची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. एटीएममध्ये सुमो पाच ते सात लाख रुपयांची कॅश असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हजारे, पीएसआय नितीन गुट्टेवार, अनवणे, ढाकणे यांनी घटनास्थळ गाठले.