गेवराई (रिपोटर)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील हे गेल्या बारा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांना सर्वस्तरातून पाठींबा मिळत आहे. आज केकत पांगरी येथे अनेक गावकर्यांनी त्यांच्या समर्थनार्थ एकदिवसाचे लाक्षणीक उपोषण सुरू केले. या वेळी अनेक नागरीकांची उपस्थिती होती. मांजरसुंबा येथील कुंबेफळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
गेल्या बारा दिवसांपासून अंतरवली सराटे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथे त्यांच्या समर्थनार्थ तागडगाव, मुदापुरी, शिराळा, माळहिवरा, रोहितळ, बेलगुळवाडी, ठाकरआडगाव, जातेगाव सह आदी परिसरातील नागरीकांनी एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या वेळी अनेक गावचे तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. मांजरसुंबा जवळील कुंबेफळ येथे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर दोन्जही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात परिसरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.