बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये सेवा देणार्या वाहन चालकांचे वेतन अद्यापही देण्यात आले नसल्याने वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनचालक कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू आहे तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणीचे पैसे द्यावे यासह इतर मागण्यांसाठी गणेश आंधळेंसह आदींचे आमरण उपोषण सुरू आहे.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यासह इतर रुग्णालयांना सेवा देणार्या वाहन चालकांचे वेतन थकलेले आहे. वेतनासाठी चालकांनी अनेक वेळा आरोग्य विभागाकडे मागणी केली मात्र आरोग्य विभाग त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. आज महाराष्ट्र राज्य 102 वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडून ऊसतोडणीचे पैसे देण्यात आले नाही. ते देण्यात यावे, 50 टक्के वाहतूक व तोडणी कमिशन देण्यात यावे, डिझेल फरक बिल देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी गणेश राजाभाऊ आंधळेंसह आदी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.