बीड शहर डीबी पथकासह अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; एकावर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): बीड शहरामध्ये सर्रासपणे नशेचे पदार्थ मिळू लागल्याने अनेक लहान मुले नश्याचे आहारी गेले आहेत. नश्याचे पदार्थ विकणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कारंजा टॉवरजवळ एक व्यक्ती नश्याचे औषध घेऊन येत असल्याची माहिती डीबी पथकाला झाल्यानंतर या पथकाने सापळा रचून सदरील व्यक्तीला पकडले. त्याच्याकडून औषधासह गोळ्यांचा साठा आढळून आला. त्याच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील विविध भागांमध्ये नश्याचे पदार्थ विकले जातात. त्यामध्ये खोकल्याचे औषध, झोपेचे गोळ्या, स्टिकफास्ट, सुलेचन आदींची समावेश आहे. नशिले पदार्थ विक्री करणार्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. आज सकाळी कारंजा टॉवर परिसरामध्ये एक व्यक्ती नशेचे पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती डीबी पथकाला झाल्यानंतर या पथकाने सापळा रचून शेख एजाज शेख हमीद (वय 40 वर्षे, रा. बुंदेलपुरा, ह.मु.बागवान गल्ली, शाहूनगर बीड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून शंभर एमएलच्या 45 बाटल्या (किंमत 8 हजार 775 रुपये) यासह अन्य 122 अबॉट कंपनीच्या बाटल्या (किंमत 22692), तसेच अल्प्राझोलम नावाचे टॅबलेटही आढळून आले. सिपला कंपनीच्या टॅबलेटस् सुद्ध त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, बीड शहर ठाणेप्रमुख मुकुंद कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवार, सय्यद अशफाक, मनोज परजने, बाळासाहेब सिरसाठ, पवन सय्यद शहेंशाह यांनी केली.
पेठ बीडमध्ये अनेक ठिकाणी होते विक्री
शहरातील विविध भागांमध्ये नशिले पदार्थ विक्री होत असून त्यात प्रामुख्याने पेठ बीड भागातल्या काही ठिकाणी नशेचे पदार्थ विक्री केले जात असून या ठिकाणी कोण विकतय याचा तपास पोलिसांनी घेऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी.
औषधे आणि गोळ्या आरोपीने आणल्या कुठून
खोकल्याचे औषध आणि झोपेच्या गोळ्या नशेसाठी उपयोगात आणल्या जाऊ लागल्या. शेख एजाज याच्याकडे जो साठा सापडला तो त्याने आणला कुठून? हा महत्वाचा प्रश्न असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, हे औषधे शक्यतो सरकारी दवाखान्यातूनच मिळतात. एकीकडे शासकीय रुग्णालयामध्ये खोकल्याचे औषध रुग्णांना मिळत नाही दुसरीकडे सर्रासपणे नश्यासाठी खोकल्याच्या औषधाचा वापर केला जातोय. झोपेच्या गोळ्यासुद्धा डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय मिळत नाही, मग याच्याकडे या गोळ्या आल्या कुठून? या आरोपीला कोणीतरी माल पुरवत असणार आहे.