बीड (रिपोर्टर)- राज्णयातील ऊसतोडणी मजुरीचा दर प्रतिटन 550 रुपये करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तर मनसेच्या वतीनेही तीव्र निदर्शने करण्यात आली. दहा रुपयाचे नाणे व्यापार्यांनी घ्यावेत यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
ऊसतोडणी दर समान करण्यात यावा, मागील दोन वर्षांपासून गुजरात राज्यामध्ये ऊसतोडणी दर प्रतिटन 476 रुपये इतका आहे. दरम्यान राज्यातील ऊसतोडणी मजूरीचा दर 550 रुपये करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मोहन जाधव, बाळासाहेब चोले, आबा राठोड, रवी राठोड, रामेश्वर चोले, विनायक चव्हाण, संजय तांदळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. तर मनसेच्या वतीनेही धरणे आंदोलन करण्यात आले. 10 रुपयाचे नाणे व्यापारी बाजारात घेत नसल्यामुळे स्पीकर लावून नाणे घेण्यासाठी जनजागृती करावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कमीत कमी दोनशे कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळवून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मनसेने आंदोलन केले. या वेळी अशोक सुरवसे, श्रीराम बादाडे, वर्षाताई जगदाळे, सदाशिव बिडवे, श्रीकृष्ण गायके, कैलास दरेकर, करण लोंढे, सोपान मोरे, रामेश्वर साळुंके, टाकळकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.