बीड (रिपोर्टर) राज्य आणि केंद्र सरकारच्णया वतीने खासगीकरणाचा सपाटा लावण्यात आला असून हे कासगीकरण थांबवण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर के.के. वडमारे यांचे उपोषण सुरू आहे तर दलित महासंघाच्या वतीनेही धरणे आंदोलन सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी एमआयएमचे आंदोलन सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरकारने विविध शासकीयकरणाचे खासगीकरण सुरू
केले आहे. हे खासगीकरण बंद करण्यात यावे, या मागणीसाठी नीळकंठ वडमारे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. तर एमआयएमच्या वतीनेही धरणे आंदोलन सुरू आहेत. पुसेसावळी जि. सातारा येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी अनेकांची उपस्थिती आहे तर दलित महासंघाच्या वतीनेही धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने शाळांचे खासगीकरण करण्याचा उद्योग सुरू केला आहे तो बंद करण्यात यावा या मागणीसाठी दलित महासंघ आंदोलन करत आहे.