बीड (रिपोर्टर)ः- केज तालुक्यातील मस्साजोग येथील पाच जण एका मजुरास जाणीवपूर्वक त्रास देत होते. पैशाची मागणी करत होते. या पाच जणांवर प्रशासन कारवाई करत नसल्याने मजुराने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली असून गंभीर अवस्थेत मजुरास उपचारार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले आहे.
समाधान शिवाजी भिवार रा.कोळगांव घाट यांची गेल्या काही दिवसापूर्वी नवनाथ बारीकराव सोनवणे, इरफान बाबा शेख, जितेंद्र बारीकराव सोनवणे, बाबा शेख, शौकत बाबा शेख रा. सर्व मस्साजोग ता.केज. जि.बीड यांच्याशी ओळख झाली. सदरील ही ओळख मजुरीतून झाली होती. वरील लोक समाधान धिवार यांना जाणीवपूर्वक त्रास देवू लागले. व त्यांच्याकडे पैशाची मागणी करु लागले. याबाबत धिवार यांनी प्रशासनाकडे तक्रारी अर्ज दिले होते. याची दखल घेतली जात नसल्याने आणि गुंड प्रवत्तीचे लोक धमक्या देत असल्याने धिवार यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी येण्याच्या वेळेत विषारी औषध प्रशान केले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून या मजुरास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.