बीड (रिपोर्टर): शाळेवर कार्यरत असणार्या शिक्षिकेचे थकित वेतन देण्यात येत नसल्याने सदरील शिक्षिका जिल्हाधिकारी कार्यायासमोर बेमुदत उपोषण करत आहे तर वासनवाडी येथील महिला सरपंचास अधिकार दिला जात नसल्याने सदरील महिलेचेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
सोमवंशी लता संतराम या साईनाथ माध्यमिक विद्यालय, वाघबेट ता. परळी येथे कार्यरत आहेत. त्यांचे थकित वेतन संस्थेने दिलेले नाही. वेतनासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र संस्था वेतन देत नसल्याने त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषणाला बसल्या आहे तर दुसरे आमरण उपोषण वासनवाडी येथील महिला सरपंचाचे आहे.पारधी समाजाच्या सुदामती शिंदे या सरपंच असतानाही त्यांना अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले. अधिकारासाठी सरपंचाना आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.