हजारो रुपयांचा माल लंपास
बीड (रिपोर्टर): बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे चोरट्याने रात्री धुमाकूळ घातला. यामध्ये सहा दुकानात चोरीच्या घटना घडल्या असून नगदी रकमेसह इतर साहित्य चोरट्याने चोरून नेले आहे. आज सकाळी पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
जयभवानी जनरल स्टोअर्स, सरस्वती ट्रेडर्स, कृष्णा मेडिकल, नगदनारायण हार्डवेअर, लालदंत मेडिकल, व सुनिल बापुराव बेदरे यांचे दुकान अशा सहा दुकानांमध्ये रात्री चोरीची घटना घडल. यामध्ये चोरट्याने नलावडे यांच्या दुकानातील दीड हजार, सपकाळ यांच्या दुकानातील काही रक्कम व इतर दुकानदारांच्या गल्ल्यातील पैसे व इतर साहित्य चोरून नेले. एकाच रात्री सहा दुकानांत चोरीच्या घटना घडल्याने साक्षाळपिंप्री येथील व्यापार्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.