बीड (रिपोर्टर) उसतोडणीचे मजूरांना पैसे मागू नकोस असे म्हणत एकाला चारचाकी गाडीत बळजबरीने बसवून एका खोलीत डांबून ठेवत जबर मारहान केल्याची घटना 7 जून रोजी कान्होबाची वाडी येथे घडली. या प्रकरणी शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला .
गोरख कचरु बोरगे (वय 26 वर्षे, रा. कान्होबाचीवाडी ता. शिरूर) याला उमेश ऊर्फ दंडम अण्णा जाधव (रा. शिरापूर ता. पाटोदा), लहू संताराम गायकवाड (रा. रायमोहा), संभाजी नेटके (रा. कोळवाडी ता. शिरूर) व अज्ञात एका व्यक्तीने बळजबरीने कान्होबाचीवाडी येथून चारचाकी गाडीत बसवून शिरापूर धुमाळ शिवारातील खडी साखर कारखान्याजवळ नेऊन तेथील एका रुममध्ये डांबून ठेवले व ‘तुला ऊसतोड मजुरांना पैशासाठी फोन करू नको, असे सांगीतलेले असतानाही तु फोन का करतो?’ म्हणत त्याला जबर मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिरूर पोलिसात कलम 365, 324, 342, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.