केज (रिपोर्टर): लोकसभेसाठी बीड येथे मतदान होत आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथी साठवण तलावाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे. तलावाच्या मागणीसाठी गावकर्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. दुपारी दीड वाजेपर्यंत एकही मतदान झालेले नव्हते. तहसीलदार, बीडीओ या अधिकार्यांनी विनंती करूनही गावकर्यांनी मतदान केले नव्हते. जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतरच आम्ही मतदानाला सुरुवात करू, असे गावकर्यांचे म्हणणे आहे.
कोरडेवाडी येथील साठवण तलावाचा प्रश्न गेल्या 30 ते चाळीस वर्षापासूनचा आहे. तलावाचे सर्वे होऊनही त्याचे काम अदद्याप करण्यात आले नाही. तलावाच्या मागणीसाठी गावकर्यांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान झाले नव्हते. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विनंती करूनही गावकर्यांनी मतदान केले नाही. जोपर्यंत जिल्हाधिकारी गावात येऊन आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मतदान केले जाणार नाही, अशी भूमिका गावकर्यांनी घेतली होती.