दिंद्रुड (रिपोर्टर)ः- नाकलगांव येथील जि.प.च्या मुख्याध्यापकाने समग्र शिक्षण अभियान, पर्यावरण संवर्धन निधीचा अपहार केला. हा निधी 1 लाख 21 हजाराचा होता. याबाबत वारंवार सरपंच आणि ग्रामस्थ या मुख्याध्यापकाला निधी बाबत विचारणा केली तर ते सरपंच आणि ग्रामस्थांवर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत होता. याबाबत वारंवार सरपंच,ग्रामस्थ गटशिक्षण आधिकारी आणि शिक्षणाधिकारी तक्रारी देवूनही कारवाई होत नसल्याने आज या शाळेच्या मुख्याध्यापक कक्षाला कुलूप ठोकले.
माजलगांव तालुक्यातील नाकलगांव याठिकाणी जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे. एप्रिल 2020 मध्ये समग्र शिक्षण अभियान, पर्यावरण संवर्धन या योजनेअंतर्गत 1 लाख 21 हजाराचा निधी आला होता. हा निधी ग्राम पंचायतीला विश्वासात न घेता व कोणतेही काम न करता मुख्याध्यापक लक्ष्मण जगन्नाथ मुंडे यांनी परस्पर हडपला. याबाबत वारंवार मुख्याध्यापकांकडे निधी कुठे खर्च झाला. याचा तपशिल सरंपच आणि ग्रामस्थ यांनी मुख्याध्यापकाला मागवला. मात्र तपशिल देण्याऐवजी उलट ग्रामस्थांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या मुख्याध्यापकांकडून देण्यात येत होता. या सर्व प्रकाराबाबत सरपंच,ग्रामस्थांनी गट-शिक्षणाधिकारी माजलगांव आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज दिल्या. मात्र याबाबत कसलीच कारवाई झाली नाही म्हणून आज अखेर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक कक्षेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.