वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील कोठारबनचे रहिवाशी व डोंगरपट्यातील राजकारणाचे भिष्माचार्य अशी ओळख निर्माण करत धारुर व वडवणी तालुक्यात राजकिय अस्तित्व प्रस्थापित करणारे माजी सभापती मोहन आनंदराव मुंडे याचं ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अकाली एक्झिट झाली असून तात्या तुमच्या जाण्याने डोंगरपट्टा पोरका झाला हो अशी अंर्तहाक दिली जात आहे.
मोहन आनंदराव मुंडे हे राजकारणातील भिष्माचार्य म्हणून ओळखले जात होतेच परंतू बालाघाटाच्या पर्वत रांगेतील गांवा-गांवात त्यांनी अग्रणिय स्थान निर्माण केल होत,गोर-गरीबांच्या मदतीला धावत म्हणून ते परिवारांसह ते जनतेचे तात्या म्हणून संबोधले गेले त्यांनी धारुर पंचायत समितीचे सभापती सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,वडवणी जि.प.गटामधून पत्नीला निवडून आणले आणि बीड जि.प.चे समाजकल्याण सभापती,तेलगांव कारखान्याचे संचालक म्हणून देखील पद भूषविले होते.अगोदरच्या काळात स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू होते यानंतर राजकिय विचारसरणी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडे आले आ.प्रकाश सोंळकेसह धनंजय मुंडे यांचे खंबीर विश्वासू म्हणून देखील ओळखले गेले.त्यांना काल
अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बीड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना औंरगाबाद येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले परंतू प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने त्यांचा आँक्सीजन खाली येत असताना ह्दयविकाराचा तिव्र झटका आला अणि त्यांची आज सकाळी साडेदहा वाजता उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली असून त्यांच्या पश्चात तीन मुल,दोन मुली सह भाऊ, भाऊजया, सुन्ना, नातवड यासह मोठा परिवार असून तात्याच्या जाण्याने डोंगरपट्टा पोरका झाला आहे.मोहन मुंडे यांच्या पार्थिवावर आज सायं 5 वा.अंतसंस्कार करण्यात येणार आहेत.मुंडे परिवाराच्या दु;खात दै.रिपोर्टर परिवार देखील सहभागी आहे.