केज (रिपोर्टर) गोगलगायीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाच काही शेतकर्यांचे सोयाबीन उगवले नाही. लहुरीच्या शेतकर्याचे सोयाबीन उगवले नसल्याने या शेतकर्याने कृषी अधिकार्याकडे तक्रार केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
भारत बन्सी चाळक यांनी सर्व्हे नं.185/1 मध्ये विजय कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनचे ग्रीन गोल्ड कंपनीचे केडीएस 726 या वाणाच्या 22 किलो दोन बॅगेची खरेदी केली होती. 3450 रूपये बियाणाची किंमत होती. दोन एक्कर क्षेत्रात त्यांनी 20 जून रोजी लागवड केली. लागवडीनंतर अद्यापही त्यांचे सोयाबीन उगवले नाही. यामध्ये शेतकर्याला आर्थिक भूर्दंड बसला असून सदरील शेतकर्याने कृषी अधिकार्याकडे तक्रार केली. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान बोगस बियाणे देणार्य कंपनीविरोधात कारवाईची मागणी महेशकुमार जगताप यांनीही केली आहे.