बीड (रिपोर्टर): पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांच्या निषेधार्थ काल शिरूरमध्ये वंजारा समाजाने बंद पुकारत निषेध नोंदवला मात्र यावेळी काहींनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अपशब्द काढले. त्या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देत यातील दोषींवर गुन्हे दाखल करत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. या वेळी निवेदन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित आले होते.
जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या निवेदनात म्हटले आहे, शिरूर कासार येथे सकल वंजारा समाजाच्या वतीने शिरूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यघावेळी उपस्थितांनी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास जाहीर सभा घेतली. समाजाला एकत्र करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत सामाजिक सलोखा बिगडवण्याच्या उद्देशाने इतर समाजावर व मराठा समाजावर दहशत निर्माण करण्या हेतू मराठा समाजाचे दैवत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत तेढ निर्माण करणारे द्वेषपुर्ण भाषण केले. मराठा समाजाविरुद्ध प्रामुख्याने माजी जि.प. सदस्य दशरथ वनवे, सुरेश उगलमुगले, रामराव खेडकर, रामदास बहे, रोहीदास पाटील व इतर पंधरा ते वीस लोकांनी जाणीवपुर्वक दोन समाजात तेढ निर्माण व्हावी, मराठा समाजाच्या भावना दुखवाव्यात, म्हणून प्रक्षोभक भाषणे करून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत टीका केली. खोटारडे वक्तव्णय करत त्याचा व्हिडिओ बनवत तो महाराष्ट्रभर पसरवला. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षकांना करण्यात आली आहे.