दिंद्रुड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातल्या अनेक गावात जलजीवनची कामे झाली असुन त्यातील काही कामे बोगस असल्याचे समोर आले आहे. या बोगस कामाच्या तक्रारी देखिल जिल्हा परिषदेेकडे करण्यात आलेल्या आहेत. धारूर तालुक्यातील कासारी येथील बोगस कामाबाबत तक्रार केल्यानंतर याची दखल घेवून कामाच्या चौकशीसाठी एक उच्च स्तरीय समिती आज दाखल झाली होती. या समितीने कामाची पाहणी केलेली आहे.
गावकर्यांना शुध्द आणि भरपुरपाणी मिळावे म्हणुन शासनाने जलजीवन ही योजना सुरू केली. या योजनेसाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला. काही ठिकाणी कामात बोगसपणा झालेला आहे. काही जणांवर याबाबत गुन्हे देखिल दाखल झाले असुन धारूर तालुक्यातील कासारी येथील बोगस कामाबाबत प्रशांत उघडे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली हेाती. या तक्रारीची दखल घेवून कामाच्या तपासणीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीने आज घटनास्थळी जावून पाहणी केलेली आहे. आता ही समिती काय अहवाल पाठवते याकडे गावकर्यांचे लक्ष लागून आहे.