चांदणी येथे घडली आज सकाळी घटना
बीड, (रिपोर्टर)ः- मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक तरूणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी बीड तालुक्यातील चांदणी येथील एका शेतकर्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती तेथील नागरीकांना झाल्यानंतरत्या ठिकाणी अनेकांनी धाव घेतली होती. आत्महत्या करण्यापुर्वी शेतकर्याने आरक्षणा संदर्भात चिठ्ठी लिहुन ठेवलेली आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासुन लढा सुरू आहे. आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक तरूणांनी आपले बलीदान दिलेले आहे. आत्महत्येचे हे सत्र अद्याप थांबलेले नाही. बीड तालुक्यातील चांदणी येथील एका शेतकर्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. लक्ष्मण लिंबा मोरे यांनी झाडाला गळफास घेवून आपली जिवन यात्रा संपविली. सदरील हा प्रकार काही गावकर्यांच्या निदर्शनास आल्यानंतर नागरीकांनी धाव घेतली होती. मयत शेतकरी लक्ष्मण लिंबा मोरे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यावर मराठा आरक्षणाचा उल्लेख आहे.