बीड, (रिपोर्टर)ः- शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतीतून योग्य उत्पादन मिळाले नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यानंतर नैराश्येत जावून आत्महत्या करतात. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान राज्यात 838 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यातच बीडमध्ये 59 शेतकर्यांनी आपले जिवन संपविले आहे.
देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात. निर्सगाचा लहरीपणा शेतीमालाला नसणारा योग्य भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. गेल्या वर्षी मराठवाड्याची परिस्थित अत्यंत नाजुक होती. दुष्काळामुळे दोन्ही हंगामात शेतकर्यांना योग्य ते उत्पादन मिळाले नाही. मराठवाड्यातील शेतकर्यांची भीस्त पावसाच्या पाण्यावर असते. मराठवाड्यात सिंंचनाचे क्षेत्र 20 टक्क्याच्या आत आहे. पाऊस पडला तरच पिकतं नाही तर शेती ओसाड होते. शेतकर्या भोवती विविध समस्यांचा विळखा पडत चालल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग पथकारु लागला. गेल्या चार महिन्यात म्हणजेच जानेवारी ते एप्रिल या दरम्यान 838 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यातील 59 शेतकर्यांनी आपले जिवन संपवलेले आहे. शेतकरी आत्महत्याची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली.