मॅनेजरला मारहाण करणार्याला तात्काळ अटक करा
बीड (रिपोर्टर): वडवणी येथील एसबीआय मॅनेजरला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून सदरील आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज एसबीआय बँक कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
दोन दिवसांपूर्वी वडवणी येथील एसबीआयचे मॅनेजर युवराज पाटील यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करणार्यांविरोधात 353 नुसार गुन्हा दाखल होऊनही आरोपीस पोलिसांनी अटक केली नाही. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज सकाळी शहरातील जालना रोड मुख्य शाखेपासून एसबीआय जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचार्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये सर्व कर्मचार्यांचा सहभाग होता.