केज, (रिपोर्टर)ः- केज शहरातील अनेक कामे प्रलंबीत आहेत ते कामे तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी केज संघर्ष समितीच्या वतीने आज सकाळी शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहुक ठप्प झाली होती. आंदोलन कर्त्याचे निवेदन मुख्याधिकारी देशपांडे यांनी स्विकारले.
केज शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बसविण्यात यावे, रोजा मोहल्लातील मुख्य रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे. स्व.गोपीनाथ मुंडे लोकनाट्य गृहाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज केज संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होंती. मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी आंदोलनकर्त्याचे निवेदन स्विकारले. यावेळी नासेर मुंडे सह आदींची उपस्थिती होती.