राष्ट्रकुलसाठीच्या स्क्वॉश संघात १४ वर्षीय अनाहत
नवी दिल्ली : बर्मिगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मंगळवारी घोषित झालेल्या भारतीय स्क्वॉश संघात १४ वर्षीय अनाहतला स्थान देण्यात आले आहे. दिल्लीच्या या युवा खेळाडूने १५ वर्षांखालील गटात चमकदार कामगिरी करत सर्वाचे लक्ष वेधले होते. नुकतेच तिने जर्मनी येथील स्पर्धेत जेतेपद पटकावले, तर जूनमध्ये आशियाई किताब मिळवला. या कामगिरीच्या जोरावरच तिला भारताच्या संघात स्थान मिळाले. पुरुष दुहेरीत वेलावन सेंथिलकुमार आणि अभय सिंग यांना राष्ट्रकुलमध्ये पदार्पणाची संधी मिळेल.
पुरुष एकेरी : सौरव घोषाल, रमित टंडन, अभय सिंग; महिला एकेरी : जोश्ना चिनप्पा, सुनना कुरुविल्ला, अनाहत सिंग; महिला दुहेरी : दिपिका पल्लिकल, जोश्ना चिनप्पा; मिश्र दुहेरी : सौरव घोषाल-दिपिका पल्लिकल, रमित टंडन-जोश्ना चिनप्पा; पुरुष दुहेरी : रमित टंडन-हिरदरपाल सिंग संधू, वेलावन सेंथिलकुमार-अभय सिंग