बीड –
शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून 307 च्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर आज त्यांना पेठ बीड पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने खांडे यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर दुसरीकडे पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून कुंडलिक खांडे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली
याबाबत अधिक असे की. दोन दिवसांपूर्वी पुंडलिक खांडे आणि अन्य एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती त्या क्लिप मध्ये कुंडलिक खांडे यांनी आपण प्रथमच पंकजा मुंडे यांना धोका देत असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीमध्ये गावातून लीड दिली मात्र अन्य बोथ वरून बजरंग सोनवणे यांना मदत केली, त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या गाडी फोडण्याबाबत चे वक्तव्य समोर आले त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक आधीच संतप्त असताना बीड पोलिसांनी मात्र रात्री कुंडलिक खांडे यांच्यावर चार महिन्यापूर्वी दाखल असलेल्या कलम 307 च्या पुण्यामध्ये जामखेड येथे त्यांना अटक केली आज सकाळी पेठ बीड पोलिसांनी दुपारी तीन नंतर खांडेंना न्यायालयासमोर हजर केले यावेळी पोलिसांनी खांड्यांसाठी पोलीस कोठडीची मागणी केली न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली .
या वेळी न्यायालयाच्या आवारात खांडे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती . एकीकडून पोलीस न्यायालय यांच्याकडून खांड्यांच्या अडचणीत वाढ होत असताना शिवसेना पक्षाने खांडेंवर कारवाई केली शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल कुंडलिक खांडे यांची बीड जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पत्र शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीसाठी दिले खांडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे