बीड (रिपोर्टर):शहरातील हिनावाले प्रसिद्ध उद्योगपती हाजी गुलाम आलमगिर सेठ यांचे मंगळवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 62 वर्षांचे होते. शहेंशाहवली दर्गा परिसरातील कब्रस्तानमध्ये रात्री 10 वा. च्या सुमारास त्यांचा दफनविधी करण्यात आला. हिना हॉटेल, हिना पेट्रोलपंप, हिना क्रेन सर्विस सह अनेक उद्योग त्यांनी उभारले आहेत.
बीड शहरातील मसरत नगर, जालना रोड येथील रहिवासी हिना ग्रुपचे संचालक हाजी गुलाम आलमगिर गुलाम मोहम्मद हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर काकु-नाना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी पुढे असायचे. शहरात त्यांनी हिना या नावाने अनेक उद्योग उभे केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सहा भाऊ, चार बहिणी, जावाई असा मोठा परिवार आहे. आलमगिर सेठ यांच्या कुटुंबियांच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.