बीड (रिपोर्टर): दैनिक चंपावतीपत्राचे संपादक नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 83 वर्ष होते त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता मोंढा रोड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
बीड जिल्ह्यातील पत्रकारितेत क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे चंपावती रत्न पुरस्कार प्राप्त दैनिक चंपावती पत्राचे संपादक नामदेवराव दादा क्षीरसागर यांचे सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झाले नामदेवराव क्षीरसागर हे पत्रकारिता सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते स्वातंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचे ते जिल्हा निमंत्रक होते याशिवाय संस्कार प्रबोधनी चे सेक्रेटरी म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले ते या संस्कार प्रबोधिनीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक एक जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मुंढा रोडवरील स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.