बीड (रिपोर्यर): जिल्हा पोलीस दलामध्ये 164 पोलीस शिपायांची भरती करायची आहे. त्यासाठी आज शहरातील आदित्य महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली. या महाविद्यालयातील 40 हॉल आरक्षित करण्यात आले होते. प्रत्येक हॉलमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. परीक्षा दरम्यान कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात भरती प्रक्रिया सुरू आहे. जे परीक्षार्थी फिजिकलसाठी पात्र ठरले होते त्या परीक्षार्थ्यांची आज आदित्य महाविद्यालयामध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. 1 हजार 724 परीक्षार्थी परीक्षेसाठी बसले होते. आदित्य महाविद्यालयातील 40 हॉल परीक्षेसाठी आरक्षित करण्यात आले होते. प्रत्येक हॉलमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या वेळी पोलिस अधिकार्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.