माजलगाव (रिपोर्टर): केंद्र सरकारने देशभरातील शेतकर्यांसाठी पीएम किसान योजना सुरु असून माजलगाव तालुक्यातील 25 ते 30 हजार शेतकरी या योजनेपासून वंचीत राहिले. याला तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. आज कृषी अधिकार्यांच्या निषेधार्थ आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कार्यालयाला ताळे ठोकण्यात आले.
शेतकर्याच्या हितासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली मात्र सर्व शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. कृषी अधिकारी कुठल्या ना कुठल्या कारणावरून शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यास टाळाटाळ करत आहेत. माजलगाव तालुक्यातील 25 ते 30 हजार शेतकरी योजनेपासून वंचीत असून या शेतकर्यांचा योजनेत समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन करून सुट्टीच्या दिवशी टाळ्यावर टाळे ठोकण्यात आले. या वेळी गंगाभीषण थावरेंसह आदींची उपस्थिती होती.