चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉडला पाचारण
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये चोर्यांचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे. दररोज अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथे रात्री घरफोडी झाली. चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरामधील नगदी 1 लाख 70 हजार रूपये व अडीच तोळे सोने चोरून नेले. चेारीच्या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तपासासाठी बीडच्या डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसापासुन बीड शहरासह ग्रामीण भागामध्ये चोरीच्याघटना वाढल्या. चोरटे दररोज कोठे ना कोठे चोर्या करू लागले. वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील दिनकर कुटे यांच्या घरी रात्री चोरी झाली. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी 1 लाख 70 हजार रूपये व अडीच तोळे सोने चोरट्याने चोरून नेले. घरात काय वाजत आहे, याची चाहुल कुटे कुटूबियांना लागल्यानंतर ते जागे झाले असता त्यांना एक चोरटा घरातून पळाला असल्याचे दिसुन आले. या बाबत कुटे यांनी पिंपळनेर पोलीसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.