वस्तीगृह प्रशासनाने माहिती खोटी दिल्याचा नातेवाईकांचा आरोप
वडवणी (रिपोर्टर):- लातूर याठिकाणी इयत्ता 7 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलाचा वस्तीगृहात काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. तर सदरील मुलगा हा परळी तालुक्यातील पांगरीचा रहिवाशी असून घटनास्थळी लातूर पोलीस दाखल झाले आहेत. कसून तपास करत आहेत. वस्तीगृहातील प्रशासनाने नातेवाईकांना खोटी माहिती दिल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला असल्याने जोपर्यत या घटनेतील आरोपी सापडत नाहीत त्यांना अटक होत नाहीत तो पर्यत मृतदेह उचलला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला असल्याने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातला घटनाक्रम पाहता मुलाचा घातपात केल्याचा संशय येत असल्याने हा खुनाचा प्रकार असावा, असा संशय बळावत असल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे.
परळी तालुक्यातील पांगरी येथील रहिवाशी असणारे राजेभाऊ खोपे हे ड्रायव्हरचे काम करतात. त्यांना एक 15 वर्षाची मुलगी तर दुसरा 12 वर्षाचा मुलगा आहे. घरची परस्थिती अंत्यत बिकट असल्याने त्यांनी एकुलत्या एक अरंविद राजेभाऊ खोपे या मुलाला नातेवाईकांच्या असऱ्याने लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता 7 वीच्या वर्गात शिक्षणासाठी दाखल केले आणि त्याच ठिकाणच्या वस्तीगृहात पण ठेवले होते.परंतु काल दुपारच्या दरम्यान वस्तीगृहतील प्रशासनाकडून अचानक आईला फोन आला तुमच्या मुलाचे दुखत आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे आँपरेशन झाले आहे. त्याठिकाणावरुनच रक्तस्त्राव होत आहे. ताबडतोब तुम्हा लातूरला या असा फोन झाल्यानंतर लगेच आईने लातूर गाठले त्याठिकाणच्या मावस भावाला घेऊन वस्तीगृहात गेल्या परंतु वस्तीगृह प्रशासनाने त्यांना आत प्रवेश न देता तुमचा मुलगा कंपाऊट वाँलवरुन उडी मारुन बाहेर पळून गेला आहे. असं सांगितल्या नंतर मावास भाऊ रोहन तरकसे यांनी परिसरात शोध घेतला परंतु अरंविद खोपे कोठेच आढळून न आल्याने पुन्हा रात्री आई व मावस भावाने वस्तीगृह गाठले तर अरंविद मुलाचा मृतदेह प्रवेशव्दारावर आढळून आला असल्याने आईने व मावस भावाने एकच आरोळी ठोकली व परिसरातील लोक जमू लागले असल्याने वस्तीगृहातील प्रशासनाने पुन्हा सदरील विद्यार्थ्याने शौचालयात गळफास घेतला असल्याची माहिती दिली तेव्हा नातेवाईकांनी आमच्या मुलाने गळफास नव्हे तर त्यांचा घात वस्तीगृहातील प्रशासनाने केला असल्याचा आरोप करण्यात आल असून घटनास्थळी लातूर पोलीस रात्रीपासून दाखल झाले असून कसून तपास करत आहेत.दुपारी एक वाजेपर्यत मृतदेह घटनास्थळी पडून आहे. जोपर्यत आरोपीचा शोध आणि अटक होणार नही तोपर्यत मृतदेह उचलाला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.