आष्टी तालुक्यात दहशत, घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक, श्वानपथक, फिंगर प्रिंट पथक डेरेदाखल
दरोडेखोरांच्या शोधासाठी चार पथकांची नेमणूक
आष्टी( रिपोर्टर):-आष्टी तालुक्यातील किन्ही येथील दरोड्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील केरुळ येथील भागवत वस्तीवर दोरडखोरांनी सोमवारी मध्यरात्री रात्री 1 ते 2 च्या दरम्यान दशहत माजवत अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.मारहाण करत दरोडखोरांनी सोने,चांदीचे, दागिने रोख रक्कम लुटली दरोडेखोरांच्या मारहाणीत राजू महादेव भागवत (वय 30) यांच्यावर सुमारे 9 चाकुचे वार झाल्याने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,श्वान पथक,फिंगर प्रिंट पथक,आष्टी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे ,नरवडे, पोलिस शिंदे,वाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांनी 4 ते 5 पथकांची नेमणूक केली आहे
.
तालुक्यातील केरुळ येथील टेंभीच्या माळाजवळील राजू महादेव भागवत यांच्या घरामध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात 5 ते 7 दरोडेखोरांनी काठी, कुर्हाड,चाकू अशी हत्यारे घेऊन घरात घुसले. कुटुंबातील मुलासह सर्वांना काठीने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली.दरोडेखोरांनी भागवत यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लूटले.भागवत यांच्या घरात दरोडेखोरांना विरोध करणार्या राजू महादेव भागवत यांना मारहाण करत त्यांच्यावर जवळपास नऊ चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना
अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर पसार झाले.गावात दरोडा पडल्याचे समजताच अनेकजण जमले.नागरिकांनी डायल 112 वर माहिती दिली.त्यामुळे पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली.तोपर्यंत दरोडेखोर दूरवर गेले होते.दरोडेखोरांना पकडण्यासाठी पहाटेपासून पोलिसांचा फौजफाटा सर्वत्र फिरत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण,आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस शोध घेत होते. घटनास्थळी
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,श्वान पथक,फिंगर प्रिंट पथक,आष्टी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे ,नरवडे, पोलिस शिंदे,वाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांनी 4 ते 5 पथकांची नेमणूक केली आहे.आष्टी पोलिस जखमींचे जवाब आणण्यासाठी अहमदनगर कडे रवाना झाले आहेत.
आठ दिवसांत दुसरा दरोडा
—————————
गेल्या आठ दिवसापूर्वीच किन्ही येथील केरुळ रोडवरील काकडे वस्तीवर दरोडा पडला होता.यामध्ये जवळपास सव्वा लाखाचे मुद्देमाल चोरत येथील कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली होती.अजून या घटनेचा तपास लागला नसतानाच किन्ही पासून पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या केरुळ येथे दरोडा टाकण्यात आला आहे.