बांधकाम करण्याचे 30 ऑगस्टचे शेवटचे अल्टिमेट
बीड (रिपोर्टर): घरकुल लाभार्थ्यांंनी घरकुलचा पहिला हप्ता उचलूनही कसल्याही प्रकारचे बांधकाम केले नसल्याने 285 लाभार्थ्यांना पंचायत समितीने नोटीस पाठवून लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे निर्देशित केले होते. या सर्व लाभार्थ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला असून 3 ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातील बांधकाम न झाल्यास लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना दरवर्षी विविध योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो. घरकुलचे हप्ते उचलूनही काही नागरीक बांधकाम करत नाहीत. काही महिन्यांपूर्वी बीड पंचायत समितीअंतर्गत 285 लाभार्थ्यांना घरकुलचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. यामध्ये संबंधितांनी कसल्याही प्रकारचे बांधकाम केले नसल्याने त्यांना पंचायत समिऋतीने नोटीसा बजावून लोभ अदालतमध्ये हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या लोक अदालतमध्ये पंचायत समितीचे सानप यांनी 30 ऑगस्ट 2024 पर्यंत बांधकाम करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम न करणार्या लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्यात येणार आहे.