जिल्हाधिकारी कार्यालयाचे अक्षरशः नाक सुजलं
ना जिल्हाधिकार्यांना देणं घेणं, ना व्यवस्थेला देणं घेणं
खोदून ठेवलेल्या नगर रोडमुळे अनेक अपघात, अपाल वृध्दांना त्रास, जनतेत प्रचंड संताप
बीड, (रिपोर्टर)ः-नगर-बीड रोड अवस्थेसाठी पार बदनाम, या रस्त्यावर मातंब्बरांची घरे, राजकारणातलं थोरलं घर या रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालय याच रस्त्यावर, पंचायत समिती, रजिस्टार ऑफीस, न्यायालय, तहसिल, विविध बँका, पोलीस मुख्यालय एवढे सर्व कार्यालय आणि व्यवस्थेतील मातंब्बर या रस्त्यावर राहत असतांना गेल्या सहा महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन ते शहराबाहेर पर्यंत दोन्ही बाजुने रस्ता खोदून ठेवलाय… काम मात्र संत गतीने आणि शुन्य प्रगतीने होत असल्याने हा रोड सर्व सामान्यांसाठी मौत का कूर्वा बनला आहे. या रस्त्याचे काम एवढ्या संत गतीने होत असल्याने प्रशासन व्यवस्थेने जणू देशी- विदेशीचा पव्वा मारून नशेडी होत या कामाकडे दुर्लक्ष करतायंत का ? असा थेट सवाल जनतेतून विचारला जाता आहे.
नगर रोडची दुर्दशा गेल्या कित्येक वर्षापासून होती, मध्यंतरी त्या रस्त्याचे काम सुरू झाले. शहरवासियांना हायसे वाटले. आता या रस्त्याचे दारिद्रय जाणार, चकाचक रस्ता होणार आणि त्या रस्त्यावरून विना अडथळा आपल्याला प्रवास करता येणार, मात्र या रस्त्याचे काम ज्या पध्दतीने होत आहे. ति पध्दत बीडकरांना मरणाच्या दारात नेहून ठेवत आहे. आधी नाल्या केल्या, त्याला कित्येक महिने घातले, नंतर रस्ता खोदून ठेवला त्यात कित्येक महिने गेले, आता खडी ओतून ठेवली त्यालाही कित्येक महिने झाले मात्र दोन्ही बाजुने खोदून ठेवलेला रस्ता होता होईना….
या रस्त्यावर जिल्ह्यातले सर्वच प्रमुख कार्यालय आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील सर्व सामान्य माणसाला या रस्तयावर रोज यावंच लागतं. परतु रस्ता खोदून ठेवल्याने प्रत्येक व्यक्तीला त्या रस्त्याने जातांना मरण यातना येतात. एक तर कुठली तरी एक बाजु खोदून ठेवायला हवी होती. तिचे काम पूर्ण झाल्यावर दुसर्या बाजूने काम हाती घ्यायला हवे होते. मात्र कोण काम चोर गुत्तेदार आहे ?अथवा एजन्सी आहे? तिने दिड शहानापणा करत दोन्ही बाजू खोदून ठेवल्या. गेल्या सहा ते आठ महिन्यापासून या रस्त्यावरून मरण यातना सहन करत लोक ये जा करत आहेत.
विशेष म्हणजे जिल्ह्याचा बाप म्हणुन ज्या जिल्हाधिकार्यांकडे पाहितले जातं त्यांचे कार्यालय, त्यांचे निवास याच रस्त्यावर आहे. त्यांची गाडी रोज याच रस्त्यानी ये जा करते . त्यांच्या डोळ्यातही रस्त्याचे हे काम खूपत नाही… की जिल्हाधिकार्यांनी झापड्या लावल्यात…. असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे. रस्त्याचे काम तात्काळ करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.