बीड (रिपोर्टर): फिर्यादी दि. राजवीर अर्बन को. ऑप. क्रेडिट, सोसायटी लि. बीड या सोसायटी कडून आरोपी नामे बाळासाहेब दशरथ जाधव यांनी रक्कम रु. 50000/- दि. 22/02/2019 रोजी कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडी पोटी आरोपिने त्यांचे खाते असलेल्या विजया बँक शाखा बीड या बँकेचा दि. 21/08/2019 रोजीचा रक्कम रु. 22926 चा चेक फिर्यादी सोसायटीस दिला.
सदर चेक न वटल्यामूळे फिर्यादी तर्फे नोटीस पाठविण्यात आली. सदर नोटीस आरोपीस मिळूनही आरोपिने फिर्यादी सोसायटरीस चेक रक्कम भरना न केलयामूळे फिर्यादी सोसायटीने आरोपी विरुध्द कलम 138 नि. इ. अॅक्ट प्रमाणे मा. प्रथमवर्ग न्याय – दंडाधिकारी साहेब बीड यांचे न्यायालयात दाखल केले. फिर्यादी तर्फे देण्यात आलेला साक्ष पुरावा ग्राहय धरुन मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब बीड यांचे न्याया- लयात दाखल केले. फिर्यादी तर्फे देण्यात आलेले साक्ष पुरावा ग्राहय धरून मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब बीड यांनी आरोपीस कोर्ट उभे पर्यन्त शिक्षा व रक्कम रु. 40,000/- फिर्यादिस देण्याचा आदेश केला. सदर रक्कम आरोपिने फिर्यादी सोसायटीमध्ये एक महिन्यात भरना करावी. सदर रक्कम भरना केली नाही तर एक महिना साधी कैदीची शिक्षा असा महत्वपूर्ण न्याय- निर्णय दि. 09/07/2024 रोजी दिला. फिर्यादी सोसायटी तर्फे अॅड. एस. आर. रुचके यांनी कामकाज पाहीले फिर्यादी सोसायटीच्या वतिने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.