साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन
बीड (रिपोर्टर): नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते, असे सांगणार्या आणि आपल्या साहित्याचा ठसा देशातच नव्हे तर जगभरात उमटवणार्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. भाऊंच्या विचारांचा प्रभाव धारदार आहे. तेव्हा कष्टकर्यांनो, दिनदुबळ्यांनो, स्वत:वरच्या विश्वासावरची धूळ नव्हे नव्हे सत्य, त्याग, अभ्यास, न्याय, सकारात्मकता, एकी, प्रेम, भाव, शुद्ध, चित्त, ज्ञान याच्यावरची धूळ झटका आणि या सर्व सकारात्मक धोरणांना धारदार बनवा.
लोकाशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शहरातून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीमध्ये उत्सव समितीचे पदाधिकारी व इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या ग्रंथदिंडीत महिलांची तितकीच उपस्थिती होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पुतळ्यासमोर सकाळपासूनच अनुयायांची रिघ लागली होती. या वेळी रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे आ. संदीप क्षीरसागर, सय्यद सलीम, प्रेमलता चांदणे, प्रा. सुशीलाताई मोराळे, पप्पू कागदे, अजिंक्य चांदणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, किसन तांगडे, शुभम धूत, रोडे, जोगदंड, सुभाष लोणके, सोनवणे, राजू महुवाले, बाळासाहेब पौळ, यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलांनी निळे फेटे बांधून साहित्य दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. हत्तीवरून निघालेल्या साहित्य दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले होते.