राजकिय वाद न राहता समाजिक द्वोष निर्माण झाला आता आपल आरक्षण आपणच टिकविण्याचे आव्हान
वडवणी (रिपोर्टर):- आरक्षणाचा मुद्दा हा समाजिक न राहता राजकिय झाला असून त्यातून समाजिक व्दोष निर्माण होत आहेत. हि गंभीर बाब असून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नाही तर नंतर आरक्षणाला धोका निर्माण होणार आहे. यासाठी आपण मताच्या आधिकाराने सर्तक राहण आवश्यक आहे. तर उध्दव ठाकरे यांनी देखील ओबीसी विरोधात भुमिका घेतली असल्याच मत यावेळी वंचितचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केले आहे.
वडवणी येथे आज दुपारी 1 वा. आरक्षण बचाव रँली दाखल झाली होती. या रॅलीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी आ. केशवराव आंधळे , जेष्ठ नेते सोमनाथ बडे, बन्शीभाउ मुंडे, बाबरी मुंडे, संजय आंधळे, चरणराज वाघमारे यांच्यासह आदी जण उपस्थित होते. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नको तर त्याच वेगळ ताट करावे अशी भुमिका आमची आहे. परंतु राज्यतील श्रीमंत मराठे हे राजकिय वाद घालत आहेत. यामुळे गांवागांवात समाजिक व्दोष निर्माण होत आहेत. हि गंभीर बाब आहे. सर्वच राजकिय पक्षची भुमिका आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण वेगळ कस द्यायच यांचा फाँर्मुला कोणाकडेच नाही. मनोज जरांगे यांची लढाई हि गरीब मराठ्याची आहे. परंतु श्रीमंत मराठा यांना विरोध करत आहे. असा घणाघाती आरोप यावेळी आंबेडकर यांनी केला आहे. तर ओबीसीच आरक्षण टिकवायचे असेल तर आता आपणच सर्तक राहिले पाहिजे निवडणुकीत मताच्या रुपाने ताकद दाखवणे गरजेचे असून आता आरक्षण विरोध मोहिम राबविली जात आहे.विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नव्हे तर नंतर आरक्षणाला धोका आहे.असं मत व्यक्त करत उध्दव ठाकरे यांनी देखील ओबीसी विरोधात भुमिका घेतली आहे. असा आरौप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या रँली संवादाला वडवणी तालुक्यातुन जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.