बीडमध्ये स्वयंरोजगार मेळाव्याला गर्दी; शेकडो तरुणांना मिळाला थेट लाभ
बीड (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंरोजगार मेळावा घेत आहोत. या मेळाव्यातून बीड मतदारसंघात शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, कल्पतरूच्या सचिव डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून बीडमध्ये के.एस.के. महाविद्यालयात शुक्रवारी (दि.2) स्वयंरोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते. व्यासपीठावर रा.काँ.चे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजयेंद्रू झा, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, मेळाव्याचे समन्वयक संकेत निकम, पोनि.शीतलकुमार बल्लाळ, एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक विजय सेलवटकर, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी विजय काकड, नाळवंडीचे सरपंच ड.राजेंद्र राऊत, पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब जोगदंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष नंदकुमार कुटे, नवगण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर काळे, माजी नगरसेवक भीमराव वाघचौरे, गणेश वाघमारे, रवींद्र कदम, सय्यद इलियास, ड.विकास जोगदंड, बिभीषण लांडगे, अच्युतराव शेळके, जैतूल्ला खान सुनील झोडगे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश शिंदे, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष माजेद कुरेशी, सरपंच अमोल बागलाने, शंकर चव्हाण, नितीन साखरे, विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, युवा नेते दत्तप्रसाद सानप आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, बीड मतदारसंघातील व्यवसाय करू इच्छिणार्या तरुणांसाठी स्वयंरोजगार मेळावा ही सुवर्णसंधी आहे. या मेळाव्यातून फास्ट फूड, इडली-डोसा विक्री केंद्र, भाजीपाला विक्री, पर्यटन आदी व्यवसायांसाठी 80 ते 95 टक्के बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात सबसिडी, व्याज परतावाचा लाभ मिळेल. यासाठी बँकांसह विविध आर्थिक विकास महामंडळांनी सर्वोतपरी सहकार्य केले आहे. या मेळाव्यातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबध्द आहे, असेही डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले. याप्रसंगी अनेक अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.पांडुरंग सुतार यांनी केले. आभार ड.राजेंद्र राऊत यांनी मानले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, सर्व बँकांचे व्यवस्थापक, विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, कर्मचारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. या मेळाव्याचा शेकडो तरुणांनी लाभ घेतला.
शेकडो तरुणांच्या हाताला काम
मिळेल-डॉ.सरिकाताई क्षीरसागर
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण अनेकांना नोकर्या उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु सर्वांना नोकरी मिळणे शक्य नाही. आपल्या भागात अनेक तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. अनेकांनी नोकरीसाठी स्थलांतर केले आहे. रोजगाराची निकड लक्षात घेता सर रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यातून शेकडो तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
मेळाव्यात अनेकांना मिळाला थेट लाभ
स्वयंरोजगार मेळाव्यात अनेकांना अर्ज भरून घेऊन थेट लाभ देण्यात आला. प्रातनिधिक स्वरूपात 5 तरुणांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप देखील करण्यात आले. या मेळाव्यात शेकडो तरुण, लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विविध बँकांचे अधिकारी, महामंडळाच्या अधिकार्यांनी सहकार्य केले.