मनोज जरांगे यांच्यावर 10 वर्षांपूर्वीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. सदरील हे वॉरंट आज न्यायालयाने रद्द केले आहे. मनोज जरांगे यांच्यावर 2013 मध्ये फसवणुकी प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात जून महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु जरांगेंनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे कोर्टासमोर हजर होण्यास असमर्थता दर्शविली होती. आज ते अॅम्ब्युलन्समधून कोर्टासमोर आले. कोर्टासमोर त्यांनी आपली प्रकृतीविषयी माहित देत अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. डॉक्टरांच्या अहवालावर आधारीत कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. कोर्टाने जरांगेंना न्यायालयाचा अवमान करू नये, अशी ताकीद दिली आहे.