बीड (रिपोर्टर) पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी प्रत्येक ठाणेप्रमुखांना आपआपल्या हद्दीत अवैध धंदेवाल्यांवर कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ठाणेप्रमुख सर्व अवैध धंद्यांना अभय देत आम्ही कारवाया करतोत, असे दाखवण्यासाठी केवळ हद्दीतील छोट्या मोठ्या धाडी टाकत आहे तर काही ठिकाणी स्वत: ठाणेप्रमुख हातभट्टीवाल्यांना फोन करून ठाण्यात बोलावून त्यांच्यावर कारवाया करतात. यावरून एसपींचे आदेश अन् ठाणेप्रमुखांची नौटंकीच दिसून येते.
जिल्ह्यात सहज अवैध कट्टा, तलवारी, दारू मिळकते. जागोजागी मटक्याचे अड्डे आहेत. यामुळे जिल्ह्यात क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सर्व ठाणेप्रमुखांना हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एसपींचे आदेश आल्यामुळे आपण काहीतरी कारवाया दाखवल्या पाहिजेत म्हणून पोलीस छोट्या-मोठ्या कारवाया करत आहेत. मात्र अवैध धंदे जोमात सुरू आहेत. पोलिस अधिक्षकांनी अशा नौटंकी करणार्या ठाणेप्रमुखांना झापावे आणि अवैध धंद्यांविरोधात सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.