बीड, (रिपोर्टर)ः- चोर्यांचे प्रमाण बीड शहरांसह ग्रामीण भागात वाढले. जिल्हा रूग्णालयात दररोज अनेक रूग्ण उपचार घेत असतात. काही रूग्ण बाह्य रूग्ण विभागात उपचार घेत असतात तर काही अंतरूग्ण विभागात उपचार घेत असतात. गर्दीचा फायदा उचलून चोरटे वार्डात जावून चोर्या करू लागले. दोन दिवसापुर्वी धाराशिव येथील एका महिलेच्या नातेवाईकाच्या खिशातील पैसे चोरीला गेले आहेत. अशा पध्दतीच्या चोर्या सर्रास पणे होवू लागल्या.
जिल्हा रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागात दरोज अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. गर्दीचा फायदा घेवून चोरटे रूग्णांच्या खिशातील पैसे मोबाईल चोरून नेतात. महिलांच्या गळ्यातील दागिनेही चोरीला जावू लागले. तसेच वार्डामध्ये चोर्या होवू लागल्या.दोन दिवसापुर्वी धाराशिव येथील एक महिला प्रसृतीसाठी जिल्हा रूग्णालयात आली होती. या महिलेच्या नातेवाईकांच्या खिशातील पैसे अज्ञात चोरट्यांनी काढून घेतले असे प्रकार सर्रासपणे घडू लागले. याची दखल रूग्णालय प्रशासनाने घेवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होवू लागली आहे.