बीड (रिपोर्टर): शहरातील नगरनाका ते पालवण चौक या दरम्यानच्या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी काही नागरीकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे तर लाडेगाव येथील गायरान जमीनीचा प्रश्न निकाली लावण्यात यावा यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्याचबरोबर अन्य आंदोलनही सुरू असून उद्या स्वातंत्र्यदिन असल्याने त्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे जिचल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय यांनी दिंद्रुड येथील बाजार भरवण्यास सक्त मनाई केलेली आहे. त्या आदेशाचे पालन करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी दिंद्रुड येथील नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे तसेच लाडेगाव येथील मागासवर्गीय कुटुंबियांना गायरान जमीन देण्यात यावी, यासाठी आंदोलन सुरू आहे. नगर रोड ते धानोरा रोड या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.म ात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने सदरील रस्त्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.ि शरूर कासार नगरपंचायत कंत्राटी शहर समन्वयक भरतीमध्ये बोगस कागदपत्रे जोहून नियुक्ती मिळवणार्या उमेदवारांची चौकशी करण्यात यावी, यासाठीही आंदोलन सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला हे आंदोलन होत असून या आंदोलनांमुळे नगर रोड परिसर दणाणून गेला आहे.