बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केचली असून आज या योजनेचा शुभारंभ होता. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. शहरातील दोनशे महिलांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते.50 महिलांना योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकार्यांसह सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेतंर्गत अनेक महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्टपासून पैसे पडण्यास सुरुवात झाली. योजनेचा शुभारंभ आज राज्यभरात करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला दोनशे महिलांची उपस्थिती होती. 50 महिलांना योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविनाश पाठक, प्रभारी सीईओ संगीतादेवी पाटील, केकान, ढाकणे, स्वामी, तांदळे मॅडमसह आदींची उपस्थिती होती.