बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्हा परिषदेमध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून 286 शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यामुळे त्यांना ना कोणती शाळा आहे ना कोणती पगार आहे. या सोबतच बीड जिल्हापरिषदेमध्ये केंद्रप्रमुख, प्राथमिक पदवीधर यांच्या अनेक जागा प्रमोशन अभावी रिक्त होत्या. अनेक शिक्षक संघटनांची या जागांवर पदोन्नती करावी. पालकमंत्र्यापासून ते जिल्हाधिकार्यांपर्यंत आणि जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकार्यांपर्यत अर्ज, विनंत्या उपोषण केले. त्याचे फलीत म्हणुन आज सह शिक्षकातून 212शिक्षकांची प्राथमिक पदवीधर पदी निवड होत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
आज जिल्ह्यातील पात्र असलेल्या 212 सह शिक्षकांना प्राथमिक पदवीधर पदी प्रमोशनदेण्यासाठी कागदपत्राची तपासणी होत आहे. ही तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पाटील यांच्याआदेशाने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे, शिक्षणाधिकारी फुलारी यांच्या उपस्थितीत या सह शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी होत आहे. ही पडताळणी झाली की रिक्त असलेल्या जागी या सह शिक्षकातून प्राथमिक पदवीधर शिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक आणि अंतरजिल्हा बदलीचे बीड जिल्ह्याला आलेले शिक्षक यांचा प्रश्न सुटणार असुन ज्या ठिकाणी शिक्षकांअभावी विद्यार्थ्याचा खोळंबा होतो अशांची सोय लागणार आहे.