नेकनूर येथील मुस्लीम समाजाची पोलिसांकडे मागणी
नेकनूर (रिपोर्टर): वादग्रस्त विधान करणार्या रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी नेकनूर येथील मुस्लीम समाजाच्या वतीने नेकनूर पोलिसांकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांचे हे विधान दोन समाजात जाणीवपुर्वक तेढ निर्माण करणारे आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी नेकनूर येथील मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आले आहे.