नेकनूर, (रिपोर्टर)ः- रस्त्याच्या संदर्भात काही महिला ग्रामपंचायतीकडे तक्रार घेवून गेल्या होत्या. ग्रा.पं. कार्यालयात सरपंच पती उपस्थित होते. या महाशयांनी महिलांच्या तक्रारी समजून घेण्याऐवजी त्यांना कार्यालयातून हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. सरपंच पतीच्या या अरेरावी पणामुळे नागरीकात संताप व्यक्त केला जात आहे.
नेकनूर येथील अनेक भागात रस्त्याचा प्रश्न गंभीर नलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसात खरा रस्त्याने चालने मुश्किल होते. काल रूक्सार कॉलनी येथील काही महिला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रार घेवून गेल्या होत्या. कार्यालयात सरपंच पती सुंदर लांडगे बसले होते. त्याच्याकड महिलांनी तक्रार मांडली असता त्यांनी तक्रार समजूनघेण्या ऐवजी महिलांनाच अरेरावीची भाषा वापरून त्यांना हाकलून दिल्याने या घटनेने महिलात संताप व्यक्त केला जात आहे.