बीड (रिपोर्टर): गेल्या वेळेस भैय्यासाहेबांमुळे आणि माझ्याही थोड्या हातभारामुळे इथला आमदार निवडून आला, परंतु दादा तो तुमच्या सोबत राहिला नाही, परंतु आता येणार्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि महायुतीचे दोन उमेदवार निवडून आणून तुमच्या पाठिशी उभा करण्याचा हा धनंजय मुंडेंचा शब्द आहे. असं म्हणत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माझी लाडकी बहीण या योजनेत बीड जिल्ह्याचा क्रमांक तिसरा असल्याचे म्हटले.
येत्या विधानसभेला बीड जिल्ह्यातून घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादीचे चार आणि मित्र पक्षांचे असे सहाही विधानसभा आमदार महायुतीचेच निवडून आणून दादा तुमच्या पाठीशी उभे करणार, पालकमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात खूप काम केलं आहे, जनता आपल्या कामावर खुष आहे आणि त्याचे बक्षीस म्हणून येत्या विधानसभेत सहाही मतदारसंघातून महायुतीचेच उमेदवार निवडून येणार, असे प्रतिपादन करत राज्यात लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा हा तिसर्या क्रमांकावर असून या जिल्ह्यातील जवळपास 3 लाख 47 महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले आहेत. असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
आपल्या महायुती सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत आहेत. बीड जिल्ह्यात या योजनेसाठी 104 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. नुकतेच परळी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन झाले. राज्यातले हे सर्वोत्तम कृषी प्रदर्शन असून याचा पायदा शेतकर्यांना झालेला आहे. शेतकर्यांनी मागचं लाईट बील भरायचं नाही आणि पुढचं द्यायचं नाही, असे म्हणत शेतकर्यांच्या लाईट बिलासाठी दादा आपल्या मार्फत 11 हजार कोटींची तरतूद करून घेतली आहे ते कृषीमंत्री या नात्याने आपल्या मार्फत समाजातील सर्वच घटकांसाठी योजना आणल्या आहेत आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या योजनेचा प्रसार करत आहेत. जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 3 लाख 47 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला असून उर्वरित सर्वमहिलांना याचा लाभ मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भगिनींचे आपल्याला आशिर्वाद मिळतील यात शंका नाही आणि येत्या विधानसभेत राष्ट्रवादी पक्षासह महायुतीचे सर्व सहाचे सहा उमेदवार निवडून येतील, असे मुंडे म्हणाले.