बीड (रिपोर्टर): गेल्या आठवड्यात पाटोदा तालुक्यात धुवॉधार पाऊस झाल्यानंतर बिंदुसरा धरण काटोकाट भरत छोट्या चादरीवरून पाणी बाहेर पडण्याचे सुखद दृश्य काल बीडकरांना पहायला मिळाल्यानंतर आता पैठणच्या नात सागरातून उजव्या कालव्याद्वारे माजलगावच्या जायकवाडी धरणामध्ये 500 क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे पाणी धरणापासून 20 कि.मी. अंतरावर असल्याची माहिती देण्यात आली. तर दुसरीकडे जिल्हाभरातील बहुतांशी धरणात पाण्याची पातळी चांगल्या प्रमाणात वाढली आहे.
बीड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जुलै महिन्यात जिल्हावासी चिंतातूर होते, मात्र ऑगस्टमध्ये काही भागात पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातही मोठठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या धरणात पाणी यायला सुरुवात जाली आहे. मांजरामध्ये एकीकडे पाणी येत असल्याने दुसरीकडे सिंदफणा धरण काटोकाट भरून बीडला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरर ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले गेले. त्यामुळे छोट्या चादरीवरून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. इकडे मृतसाठ्यात असलेले माजलगावचे जायकवाडी धरणामध्ये पैठण येथील नाथसागरात पाणी यायला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यामध्ये नाथसागर मृतसाठ्यात जाईल, असे वाटत असतानाच काल सायंकाळी पैठणच्या नाथसागरात 78 टक्क्यांपर्यंत पाणी पोहचले होते. वाढती आवक लक्षात घेऊन शुन्य टक्के पाणी असलेल्या माजलगावच्या धरणात उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे पाणी माजलगावच्या जायकवाडी धरणापासून 20 कि.मी. अंतरावर होते. दुपारी चार वाजेपर्यंत नाथसागरातून सोडलेले पाणी हे माजलगाव धरणात पोहचणार आहे.